Author Topic: येत्या पावसात असाह्य होईल  (Read 420 times)

Offline Ravi kamble

  • Jr. Member
  • **
  • Posts: 106
जगणं मरणं मरून जगणं
आमच्याच नशिबी येईल
शेतीचं काय खर नाय गड्या
येत्या पावसात असह्य होईल

खरं न्हाय काय या पावसाचं
त्यो कधीबी बांध फोडुन जाईल
पिकऊन खायचं वांद होईल गड्या
येत्या पावसात असह्य होईल

कितीबी गवात रचलं तरीबी
छ्प्पर आपलं गळकच राहील
जनावरा सकट हाल होईल गड्या
येत्या पावसात असह्य होईल

गावच्या गाव गाडुन गेली
कधी माळीन गाव मनातुन जाईल
शेतकऱ्याचं काय खरं नाय गड्या
येत्या पावसात असह्य होईल
     
      कवी
(रविंद्र कांबळे पुणे 9970291212)