Author Topic: ताई  (Read 519 times)

Offline Ravi kamble

  • Jr. Member
  • **
  • Posts: 106
ताई
« on: May 27, 2015, 11:12:02 AM »
*** ताई ***
**********
तुझे उपकार
ताई घरावर
व्हायची कसरत
तुझी रोज तारेवर
तिने संकटात
घराला तारल
माझ्या ताईच
लगीन ठरल
हो माझ्या ताईच
लगीन ठरल

ताई तु होणार
उदया ग नवरी
मन आमचीच
झाल्यात बावरी
मन हे आनंदान
आज भरल
माझ्या ताईच
लगीन ठरल
हो माझ्या ताईच
लगीन ठरल

उदया जाताना
तु ग सासुराला
परत कधी तु येणार
सांग माहेराला
तिच्या विरहान
डोळे हे भरल
माझ्या ताईच
लगीन ठरल
हो माझ्या ताईच
लगीन ठरल

(रविंद्र कांबळे पुणे 9970291212)

Marathi Kavita : मराठी कविता