Author Topic: काय असते ही कविता ?  (Read 338 times)

Offline Vedanti

  • Newbie
  • *
  • Posts: 34
  • Gender: Female
काय असते ही कविता ?
« on: May 28, 2015, 09:13:20 AM »
असते निव्वळ शब्दांची ठेवण ,
की त्यात असते एखाद्याचे दीर्घ जीवन …

असते केवळ शब्दांचे बिछाने ,
की असते एखाद्याचे बिनधास्त तऱ्हाने …

असते कविता एकाने केलेले वर्णन ,
की जणू आपणच केली आहे अशी वाटणारी शब्दांची घडण …

असते एखाद्याची निर्मळ कल्पना ,
की  जणू आपल्यालाच सुचणाऱ्या अशा काही विचार-धारणा …

कवितांतून होते भावनांची देवाण-घेवाण ,
जिच्या मोहक अर्थाने भारावून जातात काहीजण …

कविता आहेच अशी संकल्पना ,
संपूर्ण जगाला जी देऊ शकते अफाट प्रेरणा …

वेदांती  

« Last Edit: May 31, 2015, 01:25:59 PM by Vedanti »

Marathi Kavita : मराठी कविता

काय असते ही कविता ?
« on: May 28, 2015, 09:13:20 AM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
नाऊ वजा एक किती ? (answer in English number):