Author Topic: काय राव तुम्ही ?  (Read 375 times)

Offline sanjay limbaji bansode

  • Jr. Member
  • **
  • Posts: 260
काय राव तुम्ही ?
« on: May 28, 2015, 09:38:10 AM »
काय राव तुम्ही
भाषण बाजीत भरपूर कमावलं
पण विदेशात जाऊनं
सारं विरोधात गमावलं
काय राव तुम्ही, हो हो, काय राव तुम्ही !!

लई रुबाब तुमचा मोठा
नव्हता भाषणात तुमच्या तोटा
भाषण ऐकण्यासाठी तुमचं
येई अधिकारी मोठा मोठा !

विरोध करून,  भाषण ठोकून
एक एक वोटिंग कमावलं
पण विदेशात जाऊनं
सारं विरोधात गमावलं
काय राव तुम्ही, हो हो, काय राव तुम्ही !!

येण्या चांगले दिवस
केले लोकांनी हो नवस
येता तुमची सत्ता
पडले पदरात वाईट दिवस !

गावामधून शहरामधून
साऱ्या लोकांना जमवलं
पण विदेशात जाऊनं
सारं विरोधात गमावलं
काय राव तुम्ही, हो हो, काय राव तुम्ही !!

काय सांगू तुमची गोष्ट
सारे कळाले आता स्पष्ट
स्वप्न पाहिले ज्याने ज्याने
झाले साऱ्याचे आता नष्ट

संजयला पण लय आवडीने
तुम्ही प्रचारात सामावलं
पण विदेशात जाऊनं
सारं विरोधात गमावलं
काय राव तुम्ही, हो हो, काय राव तुम्ही !!


संजय बनसोडे
9819444028


Marathi Kavita : मराठी कविता