परीक्षेचा त्रास
वारे परीक्षा ! लिहिली तरी त्रास ,
नाही लिहिली तरी त्रास ,
नंबर मिळाला किवां ना मिळाला,
वही तर भरली पाहिजे ,
पेनातली शाही संपली पाहिजे ,
हाताला कष्ट दिले पाहिजे ,
घरी मला विचारले पेपर कसा गेला ?
चांगले बोलले तरी त्रास, वाईट बोलले तरी त्रास ,
चांगले बोलले तर चांगले मार्क्स आणले पाहिजे
वाईट बोलले तर मार खाल्ला पाहिजे
नापास झाले तरी त्रास , पास झाले तरी त्रास ,
पास झाले तर पुढचा वर्षाचा अभ्यास डोक्यावर घ्यायला लागणार
नापास झाल तर त्यास वर्गात बसावं लागणार
बाप रे बाप कसा करायचा अभ्यास
केला तरी त्रास नाही केला तरी त्रास
त्रास ! त्रास ! त्रास !
सौ . संजीवनी संजय भाटकर