पाऊस पडला की मनाला मनापासून भिजावासे वाटते ..
शब्दानाही मनात मग कविते सारखे रुजावसे वाटते ...
गंध आवडला तरी त्याला आपले कुणी मनात नाही...
गंध वेडा बिचारा केवडा मात्र हीच गोष्ट जाणत नाही..
पिंपलाचे झाड नेहमीच वेड्यासारखे वागते..
स्वत: ऊन सोसून लोकांवर साऊली साठी वाकत ....
प्राजक्ताच्या प्राक्तानावर लोक खूप जळतात...
पण , प्राजक्ताची दु:ख फक्त प्रजाक्तालाच काळतात...
एकाच छत्रीत दोघ असताना पावसाची सर ही आपल्याकडे वळत नाही...
श्रावणातल्या पावसा ला कसे बरसायाचे हेच कसे कळत नाही..
खूप सुखी होण सुद्धा या जगात पाप आहे..
कारण.. सुखालाही मागेपुढे दु:खाचा शाप आहे..
मनातला श्रावण आणि हलकासा पौस ..
डोळ्यातल्या आस्वानाही बघ किती बिजायची ही हौस...
पिंपलचे जालीदार पान जुन्या वहित कधीतरी सापडते...
माझे मन मग वेड्यासारखे भूतकाळात जाण्यास धडपडटे ....
मैत्रीच्या गाण्याचे शब्द असतात खूप भाउक ...
आणि, त्या सुमधुर स्वरांना सुधा मैत्री सोडून काहीच नसते ठाउक ...
मैत्री चे अनमोल नाते हीच किमया करून जाते..
कितीही दिले दुज्याला तरी आपली ओंजळ भरून वाहते...
मैत्रीचे चांदणे जेव्हा मनाच्या आभळत उतरते ..
त्याच्यासाठी जगायला मग मन वेडे आपले आतुरते...
मैत्री म्हणजे सुखामधे समोरच्याला हात देण...
मैत्री म्हणजे दु:खा मधे समोरच्याचा हात होण...
आभालाचे दु;ख रात्री लुकळुकतना आपणास दिसते ..
पण तारा म्हणून बघताना त्यात मन हे आपले वेड्यासारखे फसते...
गुलबाला काटे असतात हेच माणूस विसरतो..
म्हणूनच त्याचा हात जणू देठा वरती घसरतो..