Author Topic: पर्यावरण दिन  (Read 3485 times)

Offline Ravi kamble

  • Jr. Member
  • **
  • Posts: 106
पर्यावरण दिन
« on: June 05, 2015, 08:11:00 PM »
चल रे दादा चल ग ताई
परिसर स्वच्छ ठेवु या
करून कचऱ्याच व्यवस्थापन
आपले पर्यावरण वाचवु या

ओला कचरा सुका कचरा
जागेवरच निचरा करु या
दुर्गंधी पासुन रोगराई थांबवुन
आपले पर्यावरण वाचवु या

 सांड पाण्याचा प्रवाह
नदीत जाण्या रोखु या
नदी नाले स्वच्छ करवुन
आपले पर्यावरण वाचवु या

झाडे लावुन झाडे वाढवुन
कर्तव्य आपले बजावु या
वसुंधरेचे संगोपन करवुन
आपले पर्यावरण वाचवु या

रविंद्र कांबळे 9970291212

Marathi Kavita : मराठी कविता


किरण रावते

  • Guest
Re: पर्यावरण दिन
« Reply #1 on: March 14, 2018, 11:00:54 PM »
 सुंदर.. अानखी कविता हव्या आहेत.