कोवळ्या कळीची सर गेली
बघता बघता वळणाची वेळ आली….
एका एका आनंदाची व्याख्या बदलली
नागमोडी वळणावर ती येऊन ठेपली…
बागेत बागडण्याचा काळ तर कधीच निघून गेला
पुढचा कालावधी मैत्रिणींमध्ये रमला…
आयुष्यात आलाय एक नवीन टप्पा
संपल्या आता कॉलेजच्या कट्ट्यावरील गप्पा….
थोडं हसत थोडं रडून दिवस ते पालटले
भविष्यावर अनुभवाचे ठसे मात्र उमटले…….!!
- neha hatekar