तेच ते
सकाळी उठा
दैनंदिन व्यवहाराला सुरुवात करा
दात घासा, चहा प्या,
काम करा
जेवण - वरण, भात, भाजी ,
रोज तेच ते
कुठे हि जा
आजी, काका, आत्या, मामा,
खानावळ, हॉटेल,
जेवण - वरण, भात, भाजी ,
तेच ते
भविष्यात पाहिलं तर
मला पंख असते तर
उडून कुठवर गेली असती
वर्तमान काळात पायाने चालत
तीच माणस तेच ते जग
इतिहासात कोरता आले असते तर
त्या देवाच्या मुर्त्या
रोज देऊळात जाऊन तेच देव
तीच माणस तीच अभंगवाणी
सगळ काही तेच ते
काळ बदलला
माणस काही बदलत नाही
माणसांचे विचार तेच
रहाणीमान तेच
नदया, नाले , झाडे तीच
सगळे काही तेच ते
आत्महत्या करायची म्हटलं
तर आत्मा हि तोच तो
आणि हत्या हि तीच ती
शेवटी जीवन हि तेच ते आणि
मरण हि तेच ते.
सौ. संजीवनी संजय भाटकर
