Author Topic: माझच गणगोत सारं जाऊन तिथं नडलं  (Read 474 times)

Offline sanjay limbaji bansode

  • Jr. Member
  • **
  • Posts: 260
खैरलांजी घडलं येथ जावखेडा घडलं
माझ्याच भावाच तिथं रक्त रं पडलं !

ना कुणी आलं ना कुणाच रं अडलं
माझच गणगोत सारं येऊन तिथं नडलं !

मजबूत भीमाचा किल्ला कानी त्याच्या गेलं
ऐकूण मनुवाद्यान त्याला तेथेच संपवलं !

शिर्डीची घटना बघून रडू मज आलं
माझच गणगोत सारं येऊन तेथ नडलं !

पडली सावली झाला बाट बेदम तिला मारलं
चिमुरडा जीव होता नाही त्याला दिसलं !

कोवळ्या जीवाच्या सावलीने काय त्याचं बिघडलं
माझच गणगोत सारं येऊन तिथं नडलं !

भीमाच रक्त आम्हीं नाही रे गोठवलं
एकीचे बोल आम्हां बाबाच आठवलं !

ज्यांनी केला जातिवाद त्याला आम्हीं घेरलं
माझच गणगोत सारं येऊन तिथं नडलं !

कवी - संजय बनसोडे
9819444028