Author Topic: -- मी नास्तिक --  (Read 479 times)

Offline SHASHIKANT SHANDILE

  • Jr. Member
  • **
  • Posts: 349
  • Gender: Male
  • शशिकांत शांडिले, नागपुर
-- मी नास्तिक --
« on: June 26, 2015, 05:26:53 PM »
आज पाहिला मीही मुव्ही तो पिके
खरच नाहीरे त्यात काही नॉट ओके
मुव्हीत जर सारं होतं खोटं नाटं
तर देव दिसत का नाही मग कुठे

मंदिर मज्जिदि तर मीही गेलो
चर्चमध्ये प्रार्थनाही मी केलो
नाही गावला मला तो देव कुठे
आता मीही मूर्ख ठरलोना इथे

आज पाहिला मीही मुव्ही तो पिके
खरच नाहीरे त्यात काही नॉट ओके

कां ढोंग करतो देवाचा हा मीही
धर्मनाद करतो धर्माचा हा मीही 
माणुसकी विसरून फालतूचाच 
अंधविश्वास करतो श्रद्धेचा मीही

आज पाहिला मीही मुव्ही तो पिके
खरच नाहीरे त्यात काही नॉट ओके

विषयमंथन केला मी विचाराने
आवाजहि दिला माझ्या मनाने
शोधतो कुठेरे देव तू दगडातून
वाकली डोकी फक्त इथे भीतीने

आज पाहिला मीही मुव्ही तो पिके
खरच नाहीरे त्यात काही नॉट ओके

वैचारिक नास्तीकपनेचा निर्णय
मी आस्तिक हृदयानेच ठरवलेला
आज निर्भय शांत मन हे म्हणतो
योग्य निर्णय तू योग्यतेनेच केला

योग्य निर्णय तू योग्यतेनेच केला

आज पाहिला मीही मुव्ही तो पिके
खरच नाहीरे त्यात काही नॉट ओके

शशिकांत शांडीले (SD), नागपूर
भ्रमणध्वनी - ९९७५९९५४५०
Its Just My Word's

शब्द माझे!

Marathi Kavita : मराठी कविता