Author Topic: -- अधीर मन --  (Read 449 times)

Offline SHASHIKANT SHANDILE

  • Jr. Member
  • **
  • Posts: 349
  • Gender: Male
  • शशिकांत शांडिले, नागपुर
-- अधीर मन --
« on: July 10, 2015, 12:17:30 PM »
वाट पाहून थकलो पावसाची
पेरणी कधीच झाली
चार दिसाच्या पावसानं भिजून
जमीन कोरडी झाली

रक्ताचं मी पाणी केलं शेतमाळ सजवायला
अजून पाऊस नाही, कठीण पिक जगवायला
आताही आस नाही मेली पाऊस पडेल म्हणून
विश्वास मेहनतीवर त्याचं सोनं घडेल म्हणून 

पण कां हा अत्याचार दरवर्षी होतो
जीवनाचा खेळ अंतकरणावर येतो
मरावच का दरवर्षी शेतकऱ्याने झुरत
कधी नशिबी सौभाग्य उतरून येतो

तरसलीत डोळे शेताची हिरवळ बघायला
नको भाग पाडू देवा मजबुरीनं मरायला
घरावरं वेळ आली उपासमारानं मरणाची
बळीराजा कां करतो तू खेळी या जीवनाची

               कां करतो तू खेळी या जीवनाची
 
शशिकांत शांडीले (SD), नागपूर
भ्रमणध्वनी - ९९७५९९५४५०
Its Just My Word's

शब्द माझे!

Marathi Kavita : मराठी कविता