Author Topic: तेव्हा त्याला कळलं तो चंद्र आहे  (Read 894 times)

Offline Mayoor

  • Jr. Member
  • **
  • Posts: 137
  • Gender: Male
तिने सांगेपर्यंत कधी कळलच नव्हतं त्याला ,
की तो आहे एक सुंदरसा चंद्र
कारण जेव्हा जेव्हा तो तळ्यात निरखायचा प्रतिबिंब ,
वाऱ्याच्या लहरी विरून टाकायच्या त्या प्रतिबिंबालाच .
जेव्हा तो पाहू लागायचा स्वतःला चांदणीच्या डोळ्यांत ,
तेव्हा ती दिसायची त्याला कित्येक कोसं दूर डोळेच न दिसण्याइतकी .
जेव्हा तो पृथ्वीला विचारायचा " मी आहे कोण ?" म्हणून ,
ती आपल्याच नादात हिणवायची त्याला क्षुल्लक उपग्रह म्हणून .
त्याने शास्त्रज्ञांनाही विचारलं ' मी कोण ?' म्हणून ,
पण विजयाच्या धुंदीत त्यांनी त्याला म्हंटलं खड्डे - मातीचा गोळा .
पण आज भाऊबीजेदिवशी ती उभी राहिली आरती घेऊन , तो भाऊ नसतानाही
आणि दाखवला चांदोमामा तिने तान्हुल्याला भरवताना
तेव्हा त्याला कळलं तो चंद्र आहे .

-हर्षदा

Marathi Kavita : मराठी कविता


Offline mardmaratha

  • Newbie
  • *
  • Posts: 3
khoop khoop sunder