काल बाईक वरून शाळेच्या रस्त्यावरून फिरलो
चिमुकली मुल अन मुली कवायती करत होते
चटकन माझे मन त्या आठवणीत गेले
मनाला खूप वाटले, शाळेचे दिवस काय छान होते
शिशुवर्गात मला माझे आजोबा सोडायला आले होते
एका खांद्यावर मी न दुसर्यावर माझे दप्तर होते
गळा काढून रडत असताना बाईनी मला कडेवर घेतले
MCC मध्ये १ते जाताना वाटले, शाळेचे काय दिवस होते
दर जून पासून वह्या पुस्तकात विश्व व्यापून जायचे
कुणी शिक्षक कडक तर कुणी प्रेमळ, पण शिस्तीचे होते
कुणाकडून शाबासक्या, मार,शिक्षा यात १० वर्ष सरली
आता लेक्चर बंक केल्यावर वाटते साले काय ते दिवस होते
उन्हाळ्याच्या सुट्टीत खेळायला भरपूर मित्र असायचे
कबड्डी, लपंडाव,क्रिकेट सारखे खूप मैदानी खेळ होते
आपटणे, खरचटणे, धडपडणे हे नित्याचेच होते
आता ओर्कुट फेसबुक वापरताना वाटते ,काय ते दिवस होते
अचानक आमच्या शाळेचा भव्य सेन्डोफ आठवला
सर्व मित्र आणि शिक्षक एकमेकांना निरोप देत होते
परीक्षेच्या आधी होती आमची शेवटची भेट
आता कॅन्टीन मध्ये खाताना वाटते, खरच काय ते दिवस होते
अशा रीतीने आम्हा सर्वांच्या वाटा तिथून बदलल्या
आता कुणी फडके, कुणी स्टेशन प्लेटफोर्म वर भेटते
मग काय करतोयस, वगेरे प्रश्नावली होते
मग मध्येच दोघेही काबुल करतो , काय यार शाळेचे दिवस होते
श्रावणी सोमवार, पोळ्यासारखे सुट्टीचे बहाणे होते
भोंडला,सहली,गेद्रिंग सारखे मजेचे स्त्रोत होते
आता क्लास ला कलटी मारताना वाटते
आईशपथ कस सांगू काय माझे शाळेचे दिवस होते
-ओम (स्वरचित )
--