Author Topic: ढग आकाशी आटला  (Read 392 times)

Offline sanjay limbaji bansode

  • Jr. Member
  • **
  • Posts: 260
ढग आकाशी आटला
« on: July 17, 2015, 09:41:07 AM »
ढग आकाशी आटला
वणवा उरी रं पेटला !

वणवा उरी रं पेटला
माझा आत्मा रं फाटला !

काय म्हणू कुणा मी रं
नाही दिलं काही तू रं  !

मारिला दुष्काळी आसूडं
कसला घेतो तू रं सूड !

पाऊस अश्रूचा दाटला
वणवा उरी रं पेटला !

कोपली माझी काळी आई
साथ सूर्य तिला देई !

तूला दया मया नाही
कर्ज वाढील रं डोई !

सारा सिवार आटला
वणवा उरी रं पेटला !

कवी - संजय बनसोडे
9819444028

Marathi Kavita : मराठी कविता