Author Topic: मी  (Read 482 times)

Offline sanjay limbaji bansode

  • Jr. Member
  • **
  • Posts: 260
मी
« on: July 17, 2015, 10:28:42 AM »
गाढव झालो माकड झालो
झालो डुक्कर झालो घुस
प्राणी होऊन सैतान झालो
पण झालो नाही अजून माणूस


माणूस असून झालो कुत्रा
श्रीमंतीला चाटतोय उठसुठ
मोठ होण्यापायी झालो भित्रा
पैसे बघून हलवितो शेपूट


स्वार्थापायी झालो मांजर
पळतो तिकडे, जिकडे गाजर
पैसे खाऊन लपवतो नजर
जगी दाखवितो मीच लिडर


पेटते जेंव्हा छातीत आग
बनतो तेंव्हा रानटी वाघ
बळाच्या जोरावर घेतो बळी
सर्व संपल्यावर येते जाग


मलाही भेटतो कधी साप
उंदीर होऊन बसतो बिळ्यात
गिळतो मला करतो साफ
आवळतो फास माझ्या गळ्यात


माणूस होऊन नाही जगलो
माणुसकीलाच जगी मुकलो
या जन्मी ना काही शिकलो
माणसाचा जन्म घेऊन प्राणी झालो 


संजय बनसोडे
9819444028Marathi Kavita : मराठी कविता