Author Topic: ||कसा येवू पंढरपुरात||  (Read 396 times)

Offline Ravi kamble

  • Jr. Member
  • **
  • Posts: 106
||कसा येवू पंढरपुरात||
« on: July 29, 2015, 10:41:35 AM »
|| कसा येवू पंढरपुरात ||
××××××××××××××××××××
नाही  पाणी वावरात
श्वास आटला अंतरात
कस उगवलं बिनपावसाच
पडली पेरणी कोरड्यात 

सांग पांडुरंगा
कसा येवू पंढरपुरात

बीज करपलं शेतात
व्याज वाढलं कर्जातं
चाऱ्यावीना गुरं दावनात
रोज कसाई  मारतात   

सांग पांडुरंगा
कसा येवू पंढरपुरात

काय अर्थ एकादशीत
उपाशीच गेला बा फासात
नाही राम जगण्यात
पुन्हा मरण दुष्काळात   

सांग पांडुरंगा
कसा येवू पंढरपुरात

××××××××××××××××××××
रविंद्र कांबळे पुणे ,
मो.९९७०२९१२१२
दि.२८।०७।२०१५ .

Marathi Kavita : मराठी कविता