Author Topic: माळीण गाव  (Read 385 times)

Offline Ravi kamble

  • Jr. Member
  • **
  • Posts: 106
माळीण गाव
« on: July 30, 2015, 06:51:00 PM »
* माळीण गाव *
××××××××××××××××××××××
भिमाशंकराच्या कुशीत
नांदत होते एक गावं
क्षणात झाले भुईसपाट
त्याचे माळीण नावं

चिल्ल्यां पिल्ल्यांचा तो आवाज
अचानक गप्प झाला
हंबरणाऱ्या जनावराचां
गोठ्यातच अंत झाला

जीता जागता माणूस
जमिनीत गाडून मेला
रक्ताच्याच पावसाने
रक्ताचा चिखल झाला

असा कसा हा निसर्ग
गावावर होता कोपला
हुंदक्यात श्वास अडकले
ना माळीण गाव उरला
×××××××××××××××××××××
३० जुलै २०१४ रोजी
निसर्गकोपात मृत्युमुखी पडलेल्या
माळीण गावातील लोकांना.

* भावपुर्ण श्रद्धांजली *
×××××××××××××××××××××××
रविंद्र कांबळे पुणे 9970291212

Marathi Kavita : मराठी कविता