Author Topic: बाबा  (Read 579 times)

Offline Vedanti

  • Newbie
  • *
  • Posts: 34
  • Gender: Female
बाबा
« on: July 30, 2015, 07:08:07 PM »
आहेत जे आयुष्यातले पहिले हिरो,
ज्यांच्यामुळे कुठल्याही अडथळ्यांचा
आकडा होतो झिरो....

ज्यांच्या हातात हात धरून आले इथपर्यंत,
त्यांच्या मार्गदर्शनानेच तर पोहोचेल ध्येयापर्यंत....

काहीही न विचारता , काहीही न बोलता
प्रत्येक गोष्ट दिली त्यांनी हसून,
त्यांनी जरासा धीर देताच सगळे प्रश्न गेले
सुटून....

आजपर्यंत कुठल्याच गोष्टीला नकार दिला नाही,
त्यांच्याशिवाय जीवनाचा एक क्षणही
पुढे गेला नाही....

स्वतःसाठी काहीही न करता कुटुंबाला आनंदी
ठेवतात,
स्वतः सगळे दुःखं गिळून सगळ्यांना
मात्र खूप हसवितात...

बाबा तुम्ही खरच खूप ग्रेट आहे,
तुमच्यामूळेच तर यशाचा मार्ग सोपा आणि
स्ट्रेट आहे....

संधी मिळालेली मला मी कधीच गमावणार
नाही...
शेवटपर्यंत सोबत राहून तुम्हाला मी हसवित
राहील....
तुमच्याच पावलांवर पाऊल ठेवून ,
जीवनाचा आनंद घेत राहील......


वेदांती
vedantiagale.blogspot.com

Marathi Kavita : मराठी कविता