Author Topic: आशीर्वाद  (Read 521 times)

Offline anuswami

  • Newbie
  • *
  • Posts: 20
आशीर्वाद
« on: July 31, 2015, 08:46:04 AM »
आशीर्वाद


उत्तुंग यशाचा ताग विणायला
संस्कारांची तुम्ही दिलीत सुई
नमन साष्टांग तुम्हास गुरुवर्य
तुमसे बढकर या जीवनी काहीच नाहीघरातून निघतो बाहेर जेव्हा
हातात आईच्या दहिभात असतो
तशीच ज्ञानाची भूक भागवायला
आमच्या पाठीवर तुमचाच मायेचा हात असतोदिवस नाहीत ते राहिले आज
पण आज पुन्हा तुमच्या तासाला बसू वाटतंय
फळयावरच्या त्या सुंदर आकृत्या बघायला
आमच मन मनोमनीच दाटतंयचूकीला माफीच प्रमाण लावून
शाबासकीची थाप तुम्हीच टाकता
भेदभाव कधी ना होतो कुणाशी
हृदयी तोच समभाव तुम्ही जपताया कलियुगी आमच प्रस्थान होईल
होत जातील गुरु आमचे नगण्य
फिरून पुन्हा तुमच्याच चरणी लागू
केवळ तेव्हाच होऊ आम्ही धन्यपडतो धडपडतो पण घडतो आम्ही
दिवस आहे आज खास
आज नाही मोहवीत ते सौंदर्य
नमतो तव चरणी आम्ही
पाठीशी असाच तुमचा आशीर्वाद राहू दया गुरुवर्य !!!

कवी :- अनिकेत स्वामी, अकलूज
९५५२०३०८२८

Marathi Kavita : मराठी कविता