स्वप्न दोन जीवांचे
स्वप्न पाहिले दोन जीवांनी
गगनाला गवसणी घालण्याचे
कष्टाने जमवले काडी काडी
स्वप्न साकारले घरट्याचे
स्वप्नातल्या त्या घरट्यामध्ये
स्वागत झाले नवीन जन्माचे
आभाळात ही आनंद मावेना
साहस वाढले होते जगण्याचे
पंखात भरूनी बळ त्याच्या
सामर्थ्य दिले त्याला उडण्याचे
पिल्लाने ही घ्यावी उंच भरारी
परदेशात धडे दिले शिक्षणाचे
नव्या स्वप्नांची होईल पहाट
आतुर काळीज तो परतण्याचे
पण विपरीत झाले होते सारे
ना ओढ पिल्लाला घरट्याचे
विभक्त राहिला मायदेशात येवून
जग निर्माण केले त्याने स्वताचे
ज्या स्वप्नांसाठी झळा सोसल्या
ते स्वप्न दुभंगले त्या दोन जीवांचे
स्वलिखित:-रविंद्र कांबळे पुणे 9970291212