स्वातंत्र्य
××××××××××××××××××××××××××××
स्वातंत्र्य मिळाल्याचा
दिवस पाळला जातोय
पण स्वातंत्र जगण्याचा
हक्क काढला जातोय
स्वप्न साकारले स्वातंत्र्याचे
पण भय अजुन पारतंत्र्याचे
स्वातंत्र्य मिळाल्याचा
झेंडा मिरवला जातोय
परप्रांतीयांच्या वादावरून
राजकारण केला जातोय
स्वप्न साकारले स्वातंत्र्याचे
पण भय अजुन पारतंत्र्याचे
स्वातंत्र्य मिळाल्याचा
आव आणला जातोय
अत्याचारांन रोज
दलित मारला जातोय
स्वप्न साकारले स्वातंत्र्याचे
पण भय अजुन पारतंत्र्याचे
बंदुकीच्या गोळीचा
आवाज अजुन घुमतोय
पुरोगामीच्या लढ्याचा
रोज खून केला जातोय
स्वप्न साकारले स्वातंत्र्याचे
पण भय अजुन पारतंत्र्याचे
××××××××××××××××××××××××××××
रविंद्र कांबळे पुणे 9970291212