Author Topic: पुरुषी मानसिकता वाढली,  (Read 462 times)

Offline Sachin01 More

  • Jr. Member
  • **
  • Posts: 204
  • Gender: Male
पुरुषी मानसिकता वाढली,
« on: September 05, 2015, 09:26:03 PM »
पोरीची जात आज नकोशी झाली,
तिच्या मनमोकळ्या वागण्यापायी
मायेची ती जननी मानली,
जन्मा येण्याआधीच तिच्या नावान,
शोषणाची ती एक वस्तू मानली,
भावना , स्वाभिमान विसरुन तिचं आयुष्य,
सर्कशीतली तिला बाहुली मानली,
त्याग अन् प्रेमाची ज्योत पेटविणार्या तिला
पोटातच जीव घोटाय लागली,
माय असो की बाप,
तिच्या येण्याच्या विचारानेच अस्वस्थ झाली,
किती हो दुनिया ही स्वार्थी झाली,
माय म्हणवणार्या स्ञी लाच विरोध करु लागली,
कमअकली लोकांची ही दुनिया खरच किती निच निघाली,
जिने दिला जन्म त्या स्ञी लाच नाव ठेवू लागली,
क्षणोक्षणी हरवून तिला हो पुरुषी मानसिकता वाढली,

Marathi Kavita : मराठी कविता