Author Topic: शब्द  (Read 444 times)

Offline abhishek panchal

  • Jr. Member
  • **
  • Posts: 56
शब्द
« on: September 08, 2015, 09:41:31 AM »
शब्द , नीट वापरले तर सुख
नाहीतर दुःखाचे मूळ
नीट वापरले तर शहाणपण
नाहीतर नुसतेच खुळ

शब्द , नीट वापरले तर आनंद
अन् चेहऱ्यावर येणारे हसू
नाहीतर सारी दारं बंद
अन् नुसतेच वाहणारे आसू

शब्द , नीट वापरले तर
दोन मनातील दुवा
नाहीतर तोंडातून वाहणारी
नुसती कोरडीच हवा

शब्द , एक असे औषध
जे जोडतं मन
नाहीतर तेच तोडण्याचं
एकमेव साधन


                 -  अभिषेक पांचाळ

Marathi Kavita : मराठी कविता