Author Topic: साद  (Read 364 times)

Offline anuswami

  • Newbie
  • *
  • Posts: 20
साद
« on: September 16, 2015, 08:52:52 AM »
साद

गर्द धुक्यातून वाट काढण
मला मुश्किल होत जाई
दूर नभाच्या पल्याड उभारून
नशीब माझ हाक देत जाईहिरवळीची आस नव्हती कधी मज
तो सुगंधही त्यागला होता मी
होरपळणारा जीवच सोबती
काट्यांच्या वेदना बहू झेलल्या मीघोंगावलेल वादळ डोक्यात
घर करून राहू पाहते कसे
पुसून जातील का कधीकाळी
घाव हृदयातील अन् तमठसेना रोखता येत कधी कधीच
वाहणाऱ्या त्या भ्रमरास काळाला
न्यूनगंड ना ठेवला कधी मी
तपस्या जाईल का पण फळाला?मरणाची भीती तर हरएकाला असते
पण अपयशाच्या धुळीच काय?
यश मिळाल तर बहुत सुखी पण
त्यापुढ जाऊन अजून पाहिजे काय?या जीवनात माहीत नाही नक्की
यश म्हणून माणसाला काय हवे असते?
माझ विज्ञान एवढंच सांगू शकत
त्याला पलीकडून येणारी साद हवी असते.....

कवी - अनिकेत स्वामी, अकलूज
asswami0143@gmail.com

Marathi Kavita : मराठी कविता