Author Topic: द्वेषाचं वारं  (Read 293 times)

Offline sanjay bansode

  • Jr. Member
  • **
  • Posts: 251
द्वेषाचं वारं
« on: September 26, 2015, 05:06:22 PM »
हिंदू मुस्लिम द्वेषाचं
वारं हे सुटलं
पेटलं पेटलं पेटलं
सारं रान हे पेटलं !!

लावली ठिणगी माकडानी
झाडावर जावून बसला
जाळण्या मारण्या कापण्या
दोघांच्याही घरात घुसला
हिंदू मुस्लिम एकीचं
बांध हे फूटलं !
पेटलं पेटलं पेटलं
सारं रान हे पेटलं !!

कोण कुणाचा वैरी
ओळखून तुंम्ही घ्याना
जातीवाद्याला त्या
एकतावादी हिसका द्याना
एकोप्याच पाणी घाला
एकीच झाड खुंटल !
पेटलं पेटलं पेटलं
सारं रान हे पेटलं !!

संजय बनसोडे 9819444028


Marathi Kavita : मराठी कविता

द्वेषाचं वारं
« on: September 26, 2015, 05:06:22 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दहा गुणिले नाऊ  किती ? (answer in English number):