Author Topic: आम्हीं वादळातील कीड़े  (Read 451 times)

Offline sanjay limbaji bansode

  • Jr. Member
  • **
  • Posts: 260
आम्हीं वादळातील कीड़े
« on: October 20, 2015, 01:15:42 PM »
आम्ही वादळातील कीडे...
======================

आम्ही वादळातील कीड़े
आम्हां संघर्षाचे वेडे
झाला अन्याय अत्याचार कुठे
पाडू दुश्मनांची  मढे
आम्हीं वादळातील कीड़े !!

तलवार तळपती छत्रपतीची
लेखणी हाती भीम बाबाची
आवाज घेऊन अण्णा भाऊचा
धावू सह्यांद्रीकडे
आम्हीं वादळातील कीड़े !!

कड़ी कपारी दऱ्या खोऱ्यात
कुठेही असू राहू  तोऱ्यात
क्षणात जाऊ उंच आकाशी
राहू सदैव वादळ वाऱ्यात
होवून लढू वीर संभाजी
शिकवू फुले आंबेडकरी धडे
आम्हीं वादळातील कीड़े !!

तूफ़ान वारा पाऊस धारा
आम्हां न सिवे विजेचा मारा
झोपलेल्यांना करून जागे
जागवू आम्हीं महाराष्ट्र सारा
सांगे संजय होईल विजय
चल त्या वीर गतीकडे
आम्ही वादळातील कीड़े !!

संजय बनसोडे -9819444028

Marathi Kavita : मराठी कविता