रोज जाते आई टाकून बाळा पाठी,
धावपळ करते सारी रोजच्या कामासाठी.
वर दाखवते हसू, झुरते अंतरी परी,
जशी काही पाळण्यास लोंबकळे दोरी.
दुपारी खाते घास, परी काळजीत भिजवून,
झोपला का बाळ? पुसे घरी लावूनिया फोन.
नेमका रडतो बाळ,फोन ठेवायच्या वेळी,
तरी झोपले आहे बाळ असे,सर्वाना सांगते खुळी.
पण मनातल्या मनात होते ममतेची मोळी.
मग तशीच राहते डब्यामध्ये अर्धी संपलेली पोळी.
इतकी काळजी असे कि छाती फुटेल असे वाटे,
बोचतात प्रत्येक सेकंद जसे काही काटे.
संपल्यावर काम, जाते धावतच घरी,
बघते कुणी खेचतो पाळण्याची दोरी.
आत रडे बाळ,झाले भुकेने व्याकूळ.
मग भान राहत नाही तिचे तिला,
होतो तिचा अवघाची गोकुळ.
बाळ हि मग असा बिलगतो स्तना,
स्तिरवत नाही मग आईचाही पान्हा.
विसावते बाळ डोके ठेऊन मांडीवर.
दाटुनी येती ढग मातृत्वाच्या डोळाभर.
भावना होतात साऱ्या मातृत्वाच्या मूक.
सांगते क्षण क्षणा बाळा, नाही मातृत्वात चूक.
सोडून जाताना तुला मी हि विव्हळते खूप.
पण नुसत्या प्रेमावर क्षमत नाही पोटातली भूक.
--------