तूझा सहवास मज लाभला
वाटे सोन्याहून पीवला
तो हात हाती मज दिला
आनंद मनी मज दाटला
ज्या शोधात होतो
ते सुख शोधून थकलो होतो
अचानक तो हात पाठी पडला
आणि मनी मज आनंद दाटला
जो हात माझ्या पाठी पडला
तो माझ्यासाठी मोलाचा ठरला
अशीच आमची मैत्री राहों
या आलवनिचा मी फोडतो टाहो
राहों तुझी मजवरी माया
संकटकाळी करा दया