कविता हि कोणासाठीतरी उद्देशून लिहिली जाते पण, मी कविता माझ्यासाठी लिहितो कारण,
ज्यासाठी आपण लिहितो त्याला ती आवडली नाही तर... उगाचच कवितेच अपमान नको म्हणून .......
हि कविता वाचून कुण्या स्त्री च मन दुखावला तर मला माफ करा ..........
मी जनल्यात त्यांच्या जखमा
अन ऐकल्यात कुलटाच्या व्यथा
कुणी जाहल्या आक्का इथे
काही परदेशी निघून गेल्या
कुणी केली चोरी, अन
कुणी केली नाराधामाची हत्या
कुणी वासनेसाठी तर, कुणी
बालपणीच विकल्या गेल्या
काही देह विक्रीतल्या वेश्या बनल्या
कोठ्यावरल्या चंपा,चामेलीही जाहल्या
चिखलात जन्म जाहला त्यांचा
अन चिखलातच मरुनी गेल्या
ना मायेचा कळवळा जिथे
जिथे ना प्रेमाच्या नजरा
ना राहण्याचा कुठे ठिकाण
कुठे ना जगण्याचा सहारा.........
रुद्र संध्या कांबळी ................
snl_1408@yahoo.com