असे काही क्षण येती काळ बनून जीवनात,
तोडती गुंफलेलं नातं एकाच क्षणात.
सारे संपून जाते काही कळायच्या आत,
एका निर्णयाने होतो विश्वासाचा घात.
लुटून जात सारं विझून जाते वात,
हे आवरायला सारं कमी पडती दोन हात.
नियती सुद्धा करते नि:शस्रावर मात,
त्याला कमी म्हणून कि काय अहंकार करी पक्षपात.
राख होते आनंदाची आपणच फुलवलेल्या वनात,
दुख होत जेव्हा तुटते गैरसमजातून नात.
ऋणानुबंध रुजती खोलवर मनामनात.
वाटते कि जे तुटले ते कधी जुळलेलेच नसतात.
..................
[/center]