शाळा
अशी हि शाळा
मुलांवर संस्कार घडवीत असते
देशाच्या भावी पिढीचा
पायाही उभारीत असते
अशिक्षितांना सुशिक्षित करत असते
अशी हि शाळा
आयुष्यातला पहिला टप्पा असते
भविष्याची वाटचाल करायला सुरवात करते
अशी हि शाळा
मौज मज्जा टिंगल मस्करीत
मुले न्हाहून निघतात
काही चूक झाली तर मारही खातात
मस्ती मज्जा करताना मुलं आनंद लुटतात
गायन नृत्य भाषणात
बक्षीसही पटकावतात
अशी हि शाळा
सौ संजीवनी संजय भाटकर
