प्रवेश
प्रवेशासाठी होते फरफट
आई करते सोळा सोमवार
बाबा करतात अकरा मंगळवार
शेवटी प्रवेशासाठी
पालकांना विचारतात
तुमच्या खिशात पैसे किती आहेत
टेबला खालून लाच द्यावी कि टेबला वरून
सामान्य लोकांचा हाच प्रश्ण
उपास तापास करून की उपयोग
लाच घेतल्या शिवाय प्रवेश नाही
प्रवेशा शिवाय शिक्षण नाही
शिक्षण शिवाय नौकरी नाही
हि तर ह्या देशाची परंपरा
इंग्लिश शाळा होत आहेत फुल
मराठी शाळा होत आहे गुल
- सौ संजीवनी संजय भाटकर