सुखांना आले भरते ,दुख सारे झाले रिते,
आनंद आज उमटला या गालांवरी.
अश्रूंना फुटले हसू आज कितीतरी,
साऱ्या इच्छा झाल्या पूर्ण, जगण्यात राहिले शून्य.
मरणाची वेळ सोडली आज मरणावरी.
अश्रूंना फुटले हसू आज कितीतरी,
सारे सुटले खोटे पाश, ना खोटी कुठली आस.
जिवनाचा आनंद भेटला आज खरोखरी.
अश्रूंना फुटले हसू आज कितीतरी,
श्वासांना भेटली एक नवी उमेद,
यशापयशाचे कळले आज सारे भेद,
सुखे सारी सांडिली एका वेड्यापरी,
अश्रूंना फुटले हसू आज कितीतरी,
------