बोलके असले माझे डोळे,
पण अबोल राहू दे त्यांना
तुझ्या नजरे मुळे नको देऊ स्वप्न त्यांना.
बोलके असले माझे प्रेम,
पण अबोल राहू दे त्यांना
तुझ्या प्रेमा मुळे नको देऊ अर्थ त्यांना.
बोलके असले माझे गाणे,
तरी अबोल राहू दे त्यांना
तुझ्या गाण्यामुळे नको देऊ सूर त्यांना.
बोलके असले माझे स्वप्न,
पण अबोल राहू दे त्यांना
तुझ्या स्वप्ना मुळे नको देऊ कष्ट त्यांना.
बोलके असले माझे अश्रू,
पण अबोल राहू दे त्यांना,
तुझ्या अश्रू
मुळे नको देऊ दुख त्यांना.
बोलके असले आपले बंधन,
पण अबोल राहू दे त्यांना
आपल्या प्रेमासाठी नको तुटू देऊ त्यांना.
वैशाली .......................
[/b]