Author Topic: धोका  (Read 2589 times)

Offline vaishali2112

  • Newbie
  • *
  • Posts: 29
  • Gender: Female
धोका
« on: December 31, 2009, 05:44:04 PM »
पाउस धोका देईल,
पण आभाळ नाही.
लाटा धोका देतीन,
 पण गारवा नाही.

विचार धोका देतीन,
पण अश्रू नाही.
रात्र धोका देईन,
 पण सूर्य नाही.

स्वप्न धोका देतीन,
पण डोळे नाही.
वाचा धोका देईन,
 पण हृदय नाही.

पैसा धोका देईन,
 पण मेहनत नाही.
प्रेम धोका देईन,
 पण मन नाही.

हात धोका देतीन,
 पण हाताच्या रेषा नाही.
साथ धोका देईन,
पण आठवण नाही.

शत्रू धोका देतीन,
 पण मित्र नाही.
तू धोका देशीन,
 पण मी नाही.

वैशाली ......................
[/b]
« Last Edit: January 27, 2010, 10:42:05 PM by vaishali2112 »

Marathi Kavita : मराठी कविता