सांगेन केव्हा तरी....
तलवारीचे होते वार झेलले,
आज फुलांनी केले घायाळ का ?
सांगेन केव्हा तरी....
शत्रूवर सुद्धा प्रीती केली,
आज झालेत वैरी यार का ?
सांगेन केव्हा तरी....
जरी होती मनी जग जिंकण्याची आशा,
आज घेतली हि माघार का ?
सांगेन केव्हा तरी....
- लेखक अज्ञात