रोज कॅन्टीनात चहा ढोसतो जरी,
लावतो खिशास हात पाहतो वरी.
मी भिकार नी सुमार प्लेट धरतो,
हात टाकुनी खुशाल ताव मारतो,
घाबरून लाजुनी उधार मागतो,
काढतो हळूच पाय गर्दी पाहुनी.
रांग आज पाहताच हाय बोम्बले,
पैसे मागल्याविना कुणी न सोडले,
ज्याने त्याने पैसे पैसे पैसे मागले,
एकटाच फेकशील तु किती तरी?
त्या तिथे उधारखेळ पार संपला ,
मुष्टीलत्तीकासवे सुमार चोपला,
देह पलंगावरी ठार झोपला,
हाय बाधली कसून आज उधारी.
- शशांक प्रतापवार