आज असे वाटले, खुप खुप रडावे,
कोणास ठाऊक का पण, देवाच्या पाया पडावे.
आज असे वाटले, वेड मला लागावे,
मग मी मन मोकळे वेड्यासारखे हसावे,
आज असे वाटले, या अंधारातील जगण्यातून बाहेर पडावे,
मन सारे मोकळे करून उंच उंच उडावे.
आज असे वाटले, खुप खुप कही खावे,
मी पण बाकि जनंसरखे जाड जुड़ वहावे.
आज असे वाटले,मी पण स्वप्न बघावे,
मनसोक्त पाखरासारखे या विश्वात बागडावे.
आज असे वाटले, तुझ्याशी भरपूर बोलावे,
अणि बोलता बोलता सारे आयुष्य सरावे.
आज असे वाटले,आज असे वाटले.
unknown ...