एकदा सहज विचार आला, "बायको पहावी करुन"
मिळेल क मग, गोजिरवाणी "ती फुलराणी"
पाहताच कॉलेजमध्ये तिला,हरविले "देहभान"
नजरेने पाजला मज तिने,नशिला "एकच प्याला"
प्रेमबद्दल विचारताच,उत्तर असे "नाय, नो, नेव्हर"
वेडा झालो ऐकुनी शब्द,"तो मी नव्हेच"
कन्या पटविता येत नाही, असला कसला "पुरुष"
मग ठरविले शेवटचं, "सौज्जन्याची ऐशि तैशि"
जाताच जवल मी,सखीन्ना ती म्हणे "जाऊ बाई जोरात"
हा कसला तोरा म्हने "मोडेन पण वाकणार नाही"
चर्चा मात्र माझ्याबद्दल,करायच्या त्या "चारचौघी"
शेवटी हिरवा कंदील दाखविला म्हणूनी "ऑल द बेस्ट"
सगलं सारं निट झालं,"नकळत सारे घडले"
हातात येउनी दोघांच्या,पडली "लग्नाची बेडी"
लोकं सारे म्हणू लागले,"वर्हाड निघालंय लंडनला"
मित्र सारे म्हणू लागले, सर्ज्या "सही रे सही"
शेवटी झालं एकदाचं,"गाढवाचं लग्न"
होऊ देणार नाही याला, प्रेमाचं "रणांगण"
तेजस्वी अस्तिल ती, "सुर्याची पिल्ले"
म्हणू नकोस प्रिये कधी,"गेला माधव कुणीकडे"
भांडण तुझं आणि आईचं, होईल "यदाकदाचित"
संधी मिळनार नाही म्हणावयास तुज,"सासुबाइंचं असंच असतं"
प्रेम म्हणजे काय हो,"तीन पैश्यांचा तमाशा"
कटकट करुन पुन्हा म्हणायचं,"कुर्यात सदा टिंगलम"
नातवंडान्ना सांगेन मग मी,"एका लग्नाची गोष्ट"
मग तेसुद्धा म्हणतील आजोबा "तरुण तुर्क म्हातारे अर्क."
prashant