हिरवी हिरवी गार पालवी
काट्यांची वर मोहक जाली
घमघम करती लोलक पिवळे
फांदी तर काळोखी काळी
कुसर कलाकृती अशी बाभळी
तिला न ठावी नागरारीती
दूर कुठेतरी बांधावरती
झुकून जराशी उभी एकटी
अंगावरती खेळवी राघू
लाघट शेळ्या पायाजवली
बाल गुराखी होऊनिया मन
रमते तेथे सांज सकाळी
येते परतून नवेच होऊन
लेवून हिरवे नाजूक लेणे
अंगावरती माखून अवघ्या
धुंद सुवासिक पिवळे उटणे
hi kavita bhudha Indira Sant yanchi asavi.