मन फक्त उड्याच मारतंय,
पण कितीही झालं तरी वाटत जरा कमीच मारत.
अजूनही कुठे जाता येतंय त्याला उंच नभाच्या पार.
आणि अजूनतरी कुठे जाता येतंय सागरच्या त्या पार.
तो सात दिवसातच त्याच मरण शोधतोय.
त्याला सापडताच नाही आठवा वार.
उजेडाचा दिवा असून ते अंधारातच दड्या मारतंय.
मन फक्त उड्याच मारतंय.
माणुसकीच्या नात्यावर त्याचा अजूनही विश्वास नाही,
नशिबाच्या रेषांशिवाय त्याचा अजूनही श्वास नाही.
माणसातला देव त्याला अजून कुठे दिसतोय.
दुसऱ्याची भावना त्याला इतकी काही खास नाही.
ते गंगेत फक्त निर्जीव प्रेतासाठीच बुड्या मारतय.
मन फक्त उड्याच मारतंय.
अजून कुठे दिसतेय दुसऱ्याच्या पोटातली भूक,
आणि अजून कुठे कळतेय स्वैरचारातली चूक,
तो इतक का कुणाच ऐकतोय कि,
त्याची सत्विक्ताच झालीय मूक.
ते अजून दागाललेल्या कपड्यांच्याच घड्या मारतंय.
मन फक्त उड्याच मारतंय.
-------- अमोल