मृत्यूच्या धनादेशावर अंकी आणि अक्षरी,
टाकून जीवनाची किंमत तेही स्वह्स्ताक्षरी.
मुक्त मनाने देतो त्यावर स्वताची स्वाक्षरी.
घेताना मात्र त्याने तारीख टाकू दिली नाही.
म्हणाला थांब थोडंस, वेळ अजून आली नाही.
तो पर्यंत रमव थोडा जीव, झेल वर्षासरी,
तुझ्या आतच आहे आनंद, खेळ त्याच्याशी अंताक्षरी.
----- अमोल