तिला भरवला तेव्हा मऊ दुध-भात
thopatun उगी केले गाणे गात गात
वेणी घातली मी तिची किती सायासाने
राग आवरला माझा कितीदा बळाने
खेळ खळलो तिच्याशी जसे तिला हवे
नटवले, नाच केले रोज काही नवे
कशी गेली वर्षे १६ कळलेही नाही
आणि तिच्या डोळा पाणी आज पहिले मी,
शोडशीच्या तारुण्याचा कोवळा-भोळा आसू,
कसा त्याचा अर्थ लावू नि कसे काय विचारू?
"बाप" चांगला होण्यासाठी किती यत्न केला,
"आई" नाही होता आले अजूनही मला..