Author Topic: नीज नीज बाळा नको वाजवू रे खुळखुळा  (Read 791 times)

Offline sachinkagre

  • Newbie
  • *
  • Posts: 10
रूणझूण रूणझूण पायी पैंजन , पायामध्ये वाळा
नीज नीज बाळा नको वाजवू रे खुळखुळा 3
सोनियाचा पाळणा रेशमाची दोरी झोका देते नानापरी
गाणे गाऊनी तुला नीजवीते
गाणे गाऊनी तुला नीजवीते, लागुदे डोळा ,
नीज नीज बाळा नको वाजवू रे खुळखुळा ३
नानापरी केला हट्ट इच्छा पुरविली बाळाची
केशर दूध दुधात साखर
केशर दूध दुधात साखर , लोण्याचा गोळा
नीज नीज बाळा नको वाजवू रे खुळखुळा ३
एका जनार्दनी समरस गौळण हरिचारणासी आल्या
हरिचारणासी आल्या गौळणी
हरिचारणासी आल्या गौळणी , लागुदे डोळा ,
नीज नीज बाळा नको वाजवू रे खुळखुळा ३
--------------------------------------------------------
UNKNOWN