शांत, एकांत, नादान ती कळी,
फुलांच्या गावात पडली ती बळी.
मृदू पाकळ्यांचे,
पांघरून तिच्या भोवती.
काळे ढग आता आले ओथांबुनी.
भिजुनी पाऊसात,
मखमली गारव्यात,
पाकळ्यांच्या थव्यात,
कुठे लपुनी बसली रे ती कळी?
शांत, एकांत, नादान ती कळी,
फुलांच्या गावात पडली ती बळी.
वाऱ्याचा दिशेने,
हळूच डुलुनी,
पाकळ्यांचा सुगंध फैलवी.
शांत झाले ते रान,
मोकळे झाले ते आकाश.
वाटे तयासी,
सूर्याने रचावी आता रास.
वाहता वाहता
एकेकी पाकळ्यांनी
मांडला तो रिवाज
सारेच सुकुनी,
पडले ते उदास.
शांत, एकांत, नादान ती कळी,
फुलांच्या गावात पडली ती बळी.
शांत होती ती,
नादान झाली ती,
एकांत राहिली ती,
आधाराच्या पोटी फक्त काटे राहिले नशीबी, फक्त काटे राहिली नशीबी.
शांत, एकांत, नादान ती कळी,
फुलांच्या गावात पडली ती बळी.
वैशाली ...............