आपल्या देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला आणि त्यावरील लोकांच्या प्रतिक्रिया पाहून कवीला काही ओळी सुचल्या .
त्या ओळी मी तुमच्या पुढे मांडत आहे .
ही कविता आपल्या धारातीर्थी पडलेल्या शूर - वीर जवांनांना माझ्या कडून ही आदरांजली !!
--------------------------------------------------------
कवितेचे नाव आहे " हैवान "
पापणी लवावी तसे झाले होते ,
क्षणात सारे होत्याचे , नव्हते झाले होते !
उधळण रंगांचीच होती ती , रंग फक्त " लाल " होता ,
माणुसकीला बळी देणारा तो माणूस " हिरवा " होता !
सांडल्या रक्तात नाचले , नाचणारे " सैतान " होते ,
पाहून त्यांचा तो थयथयाट " हिरवे " ही " हैराण " होते !
कुठला रंग नी उधळण कुठली ती ,
माणसाच्या रुपातले ते तर " हैवान " होते !
----------------------------------------------------------------
हिमांशु डबीर
०२ - जानेवारी - २००९
अमेरिका