मूर्खपणा म्हणजे इतरांपेक्षा वेगळे आपले वागणे असते
कोणाला पटो ना पटो आपल्याच मस्तीत जगणे असते
म्हणूनच आवडते मला मूर्ख बनणे आणि बनविणे
आपल्याला ,आपल्या माणसाना वेगवेगळ्या पध्दतीने सजाविणे
मूर्खपणा म्हणजे असत फुलने आणि फुलवीणे
जगची पर्वा न करता स्वातच स्वताला भूलविणे
सप्तरंगी रंगात इंद्रधनुष्य होऊन पिघळने
आपल्या माणसांसाठी सार्या जगाशी ही झगडने
म्हणूनच आवडते मला मूर्ख बनणे आणि बनविणे
वेळ प्रसंगी स्वता वेडे बनून इतराना हसविणे
मूर्खपणा म्हणजे असत जगण आणि जगाविणे
दोन घासामधील एक घास दुसर्याना जाउन भरविणे
चुकीच्या पद्धतीने का होईना एकाद्याला आपल बनविणे
म्हणूनच आवडते मला मूर्ख बनणे आणि बनविणे
मूर्खपणा म्हणजे असत काहीतरी वेगळे सुचविने
सगळे जसे वागतात त्या मार्गाणा चुकविने
मूर्खपणा म्हणजे असत भूलने आणि भुलावीणे
वाळवंटी रूपी आयुष्यात हिरवळ फुलविणे
काहीच हातात नसते तेव्हा हे आशेच जगने असते
मूर्खपणा करूंनच नवे काही शोधणे आसते
म्हणूनच आवडते मला मूर्ख बनणे आणि बनविणे
=============================================
सुगंध