आज बसलीये मी
उन्च कड्याच्या टोकावर
जीव नकोसा झालेली
म्हणून सम्पवायला निघालेली
आयुष्यात काय मिळवल आपण?
ना कधी कुणावर जीव ओतून प्रेम केल
ना कधी कुणी आपल्यावर
ना कधी सन्कटाना
धैर्याने सामोरी गेले
ना कधी असत्याविरुद्ध
बन्ड केले,
क्षूद्र किड्यासारख कोपर्यात
लपून जीवन जगले
आता बास
नको हे आयुष्य
असा विचार करून शिखराच्या
टोकावर गेले आणी
माझ मन हळूच कानात कुजबुजल
अग , कड्यावरून उडी टाकायला
पण धैर्य लागत.
Unknown