ना खन्त खेद मज आयुष्याकडे कधी मागणे नव्हते
गर्द निराशेने मी कधीच झाकोळून गेले नव्हते
मतलबी दुनियेने माझ्या भावनान्चा खून केला
वाहणार्या रुधिरातही द्वेषाचे अभीसारण नव्हते
गर्द निराशेने मी कधीच झाकोळून गेले नव्हते
बरसल्या प्रेमाच्या सरी कोरडी परी मी राहिले
मनाच्या वाळवन्टात कधी मृगजळाचे पाट नव्हते
गर्द निराशेने मी कधीच झाकोळून गेले नव्हते
सर्वस्व माझे लुटीले परन्तु राग कधी न धरीला
तुजवरी ओवाळून टाकले तन-मन जे तुझेच होते
गर्द निराशेने मी कधीच झाकोळून गेले नव्हते
Unknown